#kaaviart #काविकला
अडवलपाल, गोवा येथील हनुमान मंदिर
Hanuman Mandir at Adwalpale Village, Goa.
मध्यंतरी आम्हाला या पुरातन हनुमान मंदिराची माहिती मिळाली. आज जायचा योग आला.
या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरावराची सर्व चित्रं आणि नक्षीकाम कावी-कला या कला प्रकाराचा उपयोग करून केली आहेत.
कावि-कला ही मूळ गोव्याची असून त्याचा वापर गोव्यातील काही मंदिरे तसेच बाजूच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मंदिरांमध्ये केलेला आढळतो.





